प्रभाग 10 मध्ये काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता डावलला; उपऱ्यावर मेहेरनजर झाल्याने कार्यकर्त्यांत संताप



प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसने एका निष्ठावंत आणि होतकरू तरुणाला गेल्या अनेक महिन्यांपासून उमेदवारीचे आश्वासन दिले होते. शहरात एकनिष्ठ, प्रामाणिक आणि समाजकार्यात सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप मोहबे या युवकाने पक्षाच्या शब्दावर विश्वास ठेवून नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी स्वतःच्या खर्चाने तयारी देखील केली होती.

मागील विधानसभा निवडणुकीत मोहबे यांनी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या प्रचारासाठी जीवापाड मेहनत केली होती. पक्षाच्या कामासाठी स्वतःचे हित बाजूला ठेवून त्यांनी दिवस-रात्र प्रचार करून काँग्रेसची ताकद वाढवली होती. त्यावेळी त्यांना आगामी पालिका निवडणुकीत संधी मिळेल, असे आश्वासनही स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीची वेळ आली असता काँग्रेसने अचानक पालट करत, भाजपने उमेदवारी नाकारलेल्या राहुल प्रेमलवार यांच्यावर भरोसा ठेवत त्यांना तिकीट दिले. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, हा उपऱ्यांना खांद्यावर नाचविण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांतून होत आहे.

काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली, त्या प्रेमलवार यांनी मागील निवडणुकीतही भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. पराभवानंतर ते पुन्हा भाजपात गेले. यंदा पुन्हा भाजपाकडून तिकीट नाकारल्याने ते काँग्रेसकडे वळले आणि पक्षाने त्यांच्यावर मेहेरनजर केली.

काँग्रेसच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील काँग्रेस निष्ठावंत, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून वारंवार पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीस उमेदवारी देणारी काँग्रेसची भूमिका पक्षाच्या संघटनात्मक मूल्यांना धक्का पोहोचवणारी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

स्थानिक पातळीवर या निर्णयाविरोधात असंतोष उफाळून आला असून “निष्ठावंतांचा अपमान थांबवा” अशी भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने व्यक्त होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!