प्रदीप घाडगे आणि राजेश येलसट्टीवार यांचा 'गुण गौरव' पुरस्काराने सन्मानित
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१६/११/२०२५ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पवनी येथील शिक्षक प्रदीप घाडगे आणि द सोशल फ्रेंड्स क्लबचे सचिव राजेश येलसट्टीवार यांना यंदाच्या ‘गुण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील गुरुदेव सेवाश्रमात आयोजित एका विशेष सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.‘मदत’ सामाजिक व सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रासह देशभरातील निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जातो.
संस्थेचे संस्थापक सचिव दिनेश बाबू वाघमारे यांच्या प्रेरणेतून, समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.वैनगंगा विद्यालयाचे शिक्षक प्रदीप घाडगे आणि पवन विद्यालयाचे राजेश येलशसट्टीवार यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेने गौरविला.पुरस्कारार्थींना सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,दुपट्टा, पुष्पगुच्छ आणि संविधान पुस्तक देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याला विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश पांडव,परिकमल सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बँक नागपूरचे अध्यक्ष अनिल नगराळे, तसेच आमदार विकास ठाकरे,राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.उत्कृष्ट सामाजिक योगदानासाठी निवड झाल्याबद्दल घाडगे आणि येलसट्टीवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!