गडीसुर्लाचे सरपंच सौ. शारदा येनुरकर भाजपाकडून मजबूत दावेदार

 गडीसुर्लाचे सरपंच सौ. शारदा येनुरकर भाजपाकडून मजबूत दावेदार



मूल

गडीसुर्ला ग्रामपंचायतीच्या लोकप्रिय सरपंच सौ. शारदा संजय येनुरकर यांचे नाव बेंबाळ–जुनासुर्ला ओबीसी महिला राखीव जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रासाठी भाजपाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये अग्रस्थानी असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.

अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या येनुरकर दाम्पत्याने स्थानिक पातळीवर विकासकामे, संघटन बांधणी आणि जनसंपर्कात सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. सौ. शारदा येनुरकर या हसतमुख, समंजस आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. गावातील महिला-बालकल्याण, स्वच्छता मोहिमा, पाणीपुरवठा नियोजन, तसेच विविध ग्रामविकास उपक्रमांमध्ये त्यांचे नेतृत्व विशेषत्वाने उल्लेखनीय ठरले आहे.

तेली समाजासह बहुजन घटकांमध्ये मजबूत जनाधार आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे येनुरकर यांच्या उमेदवारीची अपेक्षा अधिक बळकट होत असून, पक्षांतर्गतही त्यांच्या नावाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

बेंबाळ–जुनासुर्ला जिल्हा परिषद मतदारसंघात ओबीसी महिला राखीव जागा असल्याने, अनुभवी व कार्यक्षम नेतृत्वाची गरज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सौ. शारदा संजय येनुरकर या सक्षम, प्रामाणिक आणि जमिनीशी जोडलेल्या कार्यकर्त्या म्हणून पुढे येत असून, भाजपाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


लोकसहभागावर आधारलेले त्यांचे कार्य आणि गडीसुर्ल्यातील त्यांचा यशस्वी विकासमॉडेल यांमुळे या मतदारसंघाकडून त्यांना मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!