राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिंगणात; चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, गडचिरोलीसह नगर परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिंगणात; चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, गडचिरोलीसह नगर परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

चंद्रपूर | प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या असून या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूती आघाडी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ‘रासप’ स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय कन्नावार मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मूल आणि गडचिरोली तालुक्यासह इतर अनेक ठिकाणी रासप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मागील निवडणुकांतील यश आणि जनाधार पाहता या वेळीही पक्षाला यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय कन्नवार यांनी सांगितले की, “चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा विचार सुरू आहे. मूल शहरासह इतर ठिकाणांहून इच्छुक उमेदवारांचे अर्ज येत आहेत. युवक आणि शेतकरी वर्गात पक्षाचा प्रभाव वाढत असून जनतेच्या प्रश्नांवर भांडवलशाही व भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेऊन रासप निवडणुकीत उतरणार आहे.”

पत्रकार परिषदेला युवक जिल्हाध्यक्ष साबीर शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!