प्रभाग ७ मधून भारती कोंतमवार यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
प्रभाग ७ मधून भारती कोंतमवार यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
समाजसेवा आणि सांस्कृतिक कार्यातून निर्माण केलेला विश्वास; नागरिक म्हणतात — “त्या खऱ्या अर्थानं जनतेच्या उमेदवार!”
भारती कोंतमवार यांचे सामाजिक कार्य विविध अंगांनी विस्तारलेले आहे. भारतीय संस्कृती संवर्धनासाठी त्या नियमितपणे जनजागृती मोहिमा राबवितात. त्यांचे पती जीवन कोंतमवार हे देखील शहरातील जवळपास प्रत्येक सामाजिक उपक्रमात सक्रिय असून, गरजूंना आर्थिक तसेच वैयक्तिक मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात.
शहराच्या विकासासाठी कोंतमवार दाम्पत्य सातत्याने प्रयत्नशील आहे. शहराला नुकसानदायक ठरणाऱ्या मालधक्का प्रकल्पाचा त्यांनी ठाम विरोध केला होता. तसेच मूल–चंद्रपूर महामार्ग चारपदरी व्हावा यासाठी जीवन कोंतमवार स्वतः पाठपुरावा करीत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना जीवन कोंतमवार म्हणाले —
“वार्डातील नागरिकांनी भारतीला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाकडे अधिकृत दावा दाखल केला आहे. पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आम्ही ती संधीचे सोने करू; अन्यथा पक्ष जे कार्य सोपवेल, ती जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडू.”
स्थानिक राजकीय वर्तुळात भारती कोंतमवार यांच्या नावाने चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये निवडणुकीला चुरस येण्याची चिन्हे दिसत असून, हा प्रभाग आगामी निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!