दिनेश जिड्डीवार रिंगणात

दिनेश जिड्डीवार रिंगणात

मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
प्रभाग क्रमांक नऊमधून दिनेश जिद्दीवार यांनी सर्वसाधारण गटातून नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली आहे.

दिनेश जिद्दीवार हे शारीरिक शिक्षक असून मुळातले शिवसैनिक आहेत.
मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
त्यांचे काँग्रेस आणि भाजपातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या नेत्यांशी जवळचे नाते असल्याने
त्यांची उमेदवारी दखलपात्र समजली जात आहे.
दिनेश जिड्डीवार यांनी उमेदवारी भरण्याची तयारी सुरू केली असून नगर परिषदेतून घर टॅक्स भरून एनओसी सुद्धा घेतली आहे

जिद्दीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की —
“कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही.”

या विधानानंतर प्रभाग क्रमांक नऊमधील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

पुढील काही दिवसांत कोण कुणाच्या पाठीशी उभं राहतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!