विविध फळ झाडे लावून पक्षी सप्ताहाची सुरुवात.
(बाळापुर येथील शासकीय रुग्णालयात स्वाब संस्था व आरोग्य विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण)
तळोधी (बा.):
बाळापूर (बु.) येथील ग्रामीण रुग्णालयात फळझाडे व औषधी वनस्पती लावून वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरिता सतत कार्य करणाऱ्या 'स्वाब नेचर केअर फाउंडेशन' तर्फे पक्षी सप्ताहात फक्त पक्षाबद्दल चे महत्व विशद करण्याऐवजी सोबतच पक्षांसाठी नैसर्गिक वास्तव्य उपलब्ध करणे, पक्ष्यांच्या आहाराची गरज लक्षात घेता नैसर्गिक व्यवस्था म्हणून निसर्गात विविध प्रकारची फळझाडे लावणे गरजेचे असल्याचे ध्यानात घेत या स्वाब संस्थेच्या वतीने ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी, अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील, बाळापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शंभर विविध प्रकारचे फळझाडे यामध्ये पेरू,आंबा, करवंद,सिताफळ, फणस, जांभूळ, डाळिंब, आवळा, कवट, बेहडा, हिरडा, चिंच, अडुळसा, चिंचबिल, अशी पक्षांच्या भविष्याची उपाययोजना करत अशा विविध प्रकारचे फळझाडे व औषधी वनस्पती लावून ही संपूर्ण झाडे जगवण्याची हमी घेत पक्षी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हे शासनातर्फे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन व स्थानिक पर्यावरण संस्थांद्वारे या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. स्थानिक व प्रवासी पक्षी, तसेच पक्षांबद्दल चे पर्यावरणातील महत्त्व, पक्षी संरक्षणाचे त्यामागील उद्देश, राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य घेऊन हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो. याच अनुषंगाने 5 नोव्हेंबरला वृक्षारोपण करून या सप्ताहाची संस्थेतर्फे सुरुवात करण्यात आली.
या वृक्षारोपणा करिता सामाजिक वनीकरण शिंदेवाही यांच्या द्वारे तर्फे तथा स्वतः तयार केलेली फळझाडे स्वाब संस्थेतर्फे पुरविण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम , शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, पदाधिकारी शुभम निकेशर,आदित्य नान्हे, स्वराज मोहुर्ले, सुरज नेवारे, बाळापूर येथील आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती प्रभाकर हिवरकर , डॉ प्रतीक दिलीप इरदंडे , तळोधी येथील ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. तुषार मंडल, घनश्याम समर्थ परिचर, रवींद्र नागोसे वाहन चालक, इत्यादी उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण वृक्षांना जगवण्याची हमी घेतली.
"पक्षी सप्ताहात फक्त पक्षाबद्दल चे महत्व विशद करण्या सोबतच पक्षांसाठी नैसर्गिक आश्रयस्थान उपलब्ध करणे, पक्ष्यांच्या आहाराची गरज लक्षात घेता नैसर्गिक व्यवस्था म्हणून निसर्गात विविध प्रकारची फळझाडे लावणे गरजेचे असल्याचे ध्यानात घेत कोणत्याही शासकीय प्रभागाने आपल्या परिसरामध्ये विविध फक्त फुलझाडे व शो ची झाडे लावण्या ऐवजी औषधीय वनस्पती व
फळं झाडेच लावावी पक्षांसोबत मानवांना नैसर्गिक फळांचा आस्वाद घेता येईल." असे यावेळी यश कायरकर स्वाब संस्थाध्यक्ष यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!