मूल येथे पॉलीटेक्नीक कॉलेजला मंत्रीमंडळाची मोहर

मूल शहरासाठी मोठी आनंदाची बातमी — आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मूल शहरात नवीन शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज स्थापन करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे!

मागील विधानसभा निवडणुकीत आमदार मुनगंटीवार यांनी दिलेलं आश्वासन आज प्रत्यक्षात उतरलं आहे.

या निर्णयामुळे मूल शहराचा शैक्षणिक विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

पॉलीटेक्नीक कॉलेज सुरू झाल्यामुळे मूल, सावली, पोंभूर्णा आणि सिंदेवाही या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आता घराजवळच अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार वेगाने वाढेल.

स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

मूल शहराला मिळालेलं हे नवं शैक्षणिक दालन — येत्या काही वर्षांत शहराच्या विकासाला नवी गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की —

“मूल शहरातील युवकांना उच्च शिक्षणासाठी आता बाहेर जावं लागणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर एक नवा ठळक बिंदू उमटला आहे. विधानसभेत मतदारांना मी शब्द दिला होता, तो पूर्ण केला आहे.”

आज स्थानिक भाजपा कार्यकर्त्यानी या निर्णयाचा गांधी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यात भाजपा नेते मोतीलाल टहलियानी, अजय गोगुलवार, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर,प्रविण मोहुर्ले, अविनाश जगताप, किरण कापगाते, राकेश ठाकरे, मनिषा गांडलेवार, मिलींद खोब्रागडे, सोनु लाडवे, शिवाणी आगडे, सुधिर नागोशे निलेश राय, संजय येरोजवार, ममता गोजे, विवेक मांदाडे, सुनिल कुकूडकर, सचिन आगडे, आगडेताई यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!