मेरी पॉलिसी मेरे हात' उपक्रमांतर्गत पीक विमा पॉलिसींचे वाटप
अहेरी (तालुका प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या 'मेरी पॉलिसी मेरे हात' या उपक्रमांतर्गत विमा पॉलिसींचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या विमा पॉलिसी भारतीय कृषी विमा कंपनींचे जिल्हा प्रतिनिधी राकेश वायलालवार यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रतिनिधी श्रीनिवास गोदारी व अमर कड्याम यांच्या हस्ते पॉलिसी देण्यात आल्या. संबंधित विमा प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन पॉलिसी प्रदान केल्या. या उपक्रमामुळे पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांची विमा पॉलिसी वेळेवर हातात मिळाली असून, यामुळे योजना अधिक पारदर्शक आणि शेतकरी हितकारी ठरली आहे. या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!