मुनगंटीवारांच्या विकासकामांचा फायदा, भाजपला वाढता जनसमर्थन


आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार प्रा. डॉ. किरण किशोर कापगते यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि सुसंस्कृत प्रतिमेमुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा भक्कम गढ मानला जातो. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी मुल शहराचे स्वरूप बदलणारी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली—रस्ते, ड्रेनेज, सभागृह, क्रीडा संकुल, रुग्णालय अशा मूलभूत सोयी-सुविधांची उभारणी करून शहराचा सर्वांगीण विकास साधला.

नगरपरिषदेवर प्रशासक राज असतानाही मुनगंटीवार यांनी मूल शहराकडील लक्ष कमी होऊ दिले नाही. निधीची कोणतीही कमतरता भासू न देता, शहर स्वच्छतेच्या टेंडरचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या एक्स्टेंशनची तातडीने व्यवस्था त्यांनी करून दिली.

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असून स्थानिक आमदार सुद्धा भाजपचे असल्याने विकासकामांना गती मिळाली आहे. आगामी निवडणुकीत नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आली नाही तर निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामांच्या वेगाच्या तुलनेत पुढील अधिक विकासाच्या अपेक्षेने मतदारांचा कल भाजपकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे.

सुशिक्षित, गुणी व सुसंस्कृत प्रतिमेच्या उमेदवार म्हणून प्रा. डॉ. किरण कापगते यांची निवड करून भाजपने विजयाचा मार्ग अधिक मजबूत केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
"मुनगंटीवार यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे," असा जनतेचा विश्वास असून त्याच विश्वासाच्या बळावर कापगते यांच्या विजयाबाबत आश्वस्त आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!