९ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान...

९ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान...



वरोरा....जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव बु.येथील स्थानिक सर्पमित्र राकेश भूतकर यांनी अनेक विषारी तसेच बिनविषारी सापाला पकडुन जीवनदान दिले.
 दादापुर- धानोली नवरगाव रिठ परिसरात येत असलेल्या दादापुर गावातील रोशन लटारी लेडांगे यांच्या शेतात धान कापणी सुरू असताना अजगर साप आढळून आल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.यावेळी सर्पमित्र राकेश भुतकर यांना माहिती मिळताच कसलाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहचून ९ फूट लांब व ११ कीलो वजनाचा अजगराला पकडण्यात यश आले.या सापाला मेसा येथील कक्ष क्रमांक १२ या जंगलात सोडण्यात आले.असुन या वेळी शेगाव वनक्षेत्र सहाय्यक जितेंद्र लोणकर, सर्पमित्र राकेश भुतकर, वनमजूर अतुल गायकवाड, सहकारी मित्र प्रदीप चौधरी,अजय ढोक,राकेश माथनकर,नयन खिरटकर इत्यादी हजर होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!