मोहबे समर्थक मैदानात उतरले; भाजप उमेदवारांच्या विजयाची शक्यता आणखी मजबूत

 मोहबे समर्थक मैदानात उतरले; भाजप उमेदवारांच्या विजयाची शक्यता आणखी मजबूत



प्रभाग १० मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल : संदीप मोहबे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची अडचण वाढली

प्रभाग १० मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस कार्यकर्ते संदीप मोहबे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या बदलाचे राजकीय पडसाद स्पष्टपणे उमटू लागले आहेत. मोहबे यांचा या प्रभागातील मजबूत चाहता वर्ग असल्याने त्यांच्या निर्णयाचा थेट परिणाम काँग्रेस उमेदवार राहुल प्रेमलवार यांच्या प्रचारावर होताना दिसत आहे.

मोहबे यांना काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारीचे आश्वासन दिले जात होते. मात्र, ऐनवेळी प्रसिध्द दलबदलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल प्रेमलवार यांना उमेदवारी देताच मोहबे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. अखेर आपल्या समर्थकांसह मोहबे यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपनेही त्यांचा सन्मान राखत त्यांना शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

या घडामोडीनंतर मोहबे समर्थक आता भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी जोमानं कामाला लागले आहेत.

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत या प्रभागात काँग्रेसचा स्थानिक उमेदवार असतानाही भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीतही प्रभाग १० मध्ये भाजपाचे निलेश राय आणि बिंदू जुमडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रा. डॉ. किरण कापगाते यांनाही मोठे मताधिक्य मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!