मूल शहराच्या विकासाचा नवा अध्याय—अजय गोगुलवारांच्या विजयानं होणार सुरूवात

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अजय गोगुलवार विजयी होण्याच्या दिशेने – प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचंड जनसमर्थन


भाजपाचे निष्ठावंत आणि कर्तृत्ववान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अजय गोगुलवार यांचा प्रभाग क्रमांक १ मध्ये मोठा जनसंपर्क असून, ते या प्रभागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. चार दशकांहून अधिक काळ समाजकारण, विमा सेवा आणि विविध संस्थांच्या नेतृत्वातून त्यांनी आपली ओळख भक्कम केली आहे.

४० वर्षे एलआयसी विमा एजंट म्हणून सेवा देताना हजारो नागरिकांचे क्लेम कोणत्याही तक्रारीशिवाय मंजूर करून देण्याचा त्यांचा गौरवशाली इतिहास आहे. या क्षेत्रातही त्यांनी सर्वोच्च स्थान मिळवत एक आदर्श सेवा संस्कृती निर्माण केली आहे.

धनश्री बँकेचे ते अनेक वर्षांपासून अध्यक्ष असून, त्यांच्या कार्यकाळात बँकेने सर्वांगीण प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. बँकेचा विस्तार, आर्थिक बळकटी आणि विश्वासार्हतेत त्यांनी केलेला वाटा उल्लेखनीय आहे.

याशिवाय श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे संचालन आणि कन्यका परमेश्वरी देवस्थान यांचे यशस्वी व्यवस्थापन त्यांच्या नेतृत्वक्षमतेची ठोस साक्ष देते.

मूल शहरातील सामाजिक व राजकीय घडामोडींशी सतत निगडित राहून अजय गोगुलवार यांनी मूलच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये त्यांनी केलेले काम, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि जनता-केंद्रित दृष्टिकोन यामुळे त्यांच्या विजयाची राजकीय परिस्थिती आता अधिक अनुकूल बनली आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत — अजय गोगुलवार विजयी होतील, असा विश्वास मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!