हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मुल येथील युवकास तळोधी येथे पोलीस द्वारे अटक.

हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मुल येथील युवकास तळोधी येथे पोलीस द्वारे अटक.

यश कायरकर (तालुका प्रतिनिधी):
           तळोधी येथील नवानगर जवळील  हनुमान मंदिर चौकातील  परिसरात हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मुल येथील युवकास तळोधी येथे पोलीस द्वारे अटक करण्यात आली.
     सविस्तर वृत्तान्त पोलीस स्टेशन तळोधी ला मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हनुमान मंदिर जवळील चौकात नवानगर , तळोधी येथे एक इसम हातात चाकू घेऊन शिवीगाळ, धमक्या देऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळताच सहा पोलीस नीरीक्षक राहुल गुहे तथा पो.उप नी. किशोर मानकर  व पो स्टाफ घटनास्थळी रवाना होऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. व त्याचे अंगझडतीत एक  धारदार स्टीलचा पाता व काळया रंगाची मूठ असलेला चाकू पंचासमक्ष पंचनामा जप्ती कारवाई करून ताब्यात घेतला.   
   आरोपी हा मुल येथील आठवडी बाजार वार्ड नंबर 17, मुल, तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर येथील रुपेश बंडू कापते (37) वर्ष असून याचे  विरुद्ध कलम 4, 25 भारतीय हत्यार अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
    सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी राकेश जाधव साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन तळोदी ठाणेदार सपोनि राहुल गुहे यांचे नेतृत्वात पो.उप.नि. किशोर मानकर, पोहवा सचिन  साखरकर/2488, पोहवा हंसराज सिडाम/225, पोहवा स्वप्निल चांदेकर/2573,  पोअ  नरेश फुंडे/216, मपोअ अलका डुकरे/2153, चापोअ सोनल पोपटे/6036 यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोउपनी किशोर मानकर पो स्टे तळोधी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!