मूल शहरात भू-माफियांचा सुळसुळाट! मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्यांचा डाव

 मूल शहरात भू-माफियांचा सुळसुळाट!

मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्यांचा डाव  

मोक्याच्या सरकारी जागेवर बेकायदेशीर बांधकाम

मूल | प्रतिनिधी

मूल शहरात भू-माफियांचा सुळसुळाट वाढत चालल्याची चर्चा असून, शासनाच्या मालमत्तेवरही आता बेकायदेशीर कब्ज्याची मालिका सुरू झाल्याचे समोर आले आहे. गांधी चौक परिसरातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील पंचायत समितीच्या मालकीच्या गाळ्यांवर अनधिकृत बांधकाम करून जागेवर ताबा करण्यांचा  गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या संदर्भात विजय सिद्धावार यांनी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सदर गाळे पूर्वी गुरुकुल बहुउद्देशीय संस्थेकडे सामाजिक कार्यासाठी देण्यात आले होते, मात्र त्या संस्थेची कार्य सन 2000 ते 2002 दरम्यान बंद पडले.  संस्था अस्तित्वात नसल्यांने धर्मदाय आयुक्तांनी दिनांक 18/2/2017 रोजी संस्थेची कायदेशीर नोंदणी रद्द केली असून संस्थेचे सर्व व्यवहार बंद आहेत. तरीदेखील आजही ही संस्था अस्तित्वात असल्याचा आभास निर्माण करून पंचायत समितीच्या गाळ्यांवर कब्जा करीत असल्यांचे उघड झाले आहे.

तक्रारीसोबत संस्थेच्या नोंदणी रद्दबाबत धर्मदाय आयुक्तांचे पत्र आणि गाळ्यांचे फोटो पुराव्यासह जोडले आहेत.

या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये असा प्रश्न उपस्थित होतो आहे की, “सरकारी जागांवर कब्जा करून हे भू-माफिया एवढे निर्भय कसे?”

स्थानिक प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर ठोस भूमिका घेतली नसली, तरी तक्रारीनंतर भू-माफियांच्या सुळसुळाटावर लगाम लागेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर बांधकाम बेकायदेशीर असू यावर तातडीने चौकशी व कार्यवाही करू असे संवर्ग विकास अधिकारी अरूण चणफणे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

संस्थेची नोंदणी रद्द केल्याबाबत धर्मदाय आयुक्त यांचे पत्र


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!