दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

प्रादेशिक वनविभागास मिळाले यश

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर व शिवरा येथील शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला वन विभागाच्या पथकाने  सोमवारी रात्री 08:00 वाजता जेरबंद केलेले आहे.चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवनक्षेत्र अंतर्गत डोमा बीट मध्ये 26 ऑक्टोबर ला नीलकंठ भुरे व 05 नोव्हेंबर ला ईश्वर भरडे या दोन शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते  त्यामुळे जन आक्रोश भडकला होता शंकरपूर येथे तब्बल नऊ तास प्रेत ठेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते जोपर्यंत वाघाचं बंदोबस्त करणार नाही त्यामुळे वन विभागाने पाऊले उचलत 06 सप्टेंबर पासून त्या वाघाला पकडण्याची मोहीम हाती घेतली होती त्याला पकडण्यासाठी सहा पाळीव जनावरे बांधण्यात आले होते तर 35 वनकर्मचारी व मजूर चोवीस तास पाळत ठेऊन होते अखेर पाच दिवसांच्या प्रयत्नांनतर सोमवारी सकाळी बांधून ठेवलेल्या  पाळीव जनावर मारले संन्याकाळी त्याला  खायला आले असता त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले आहे.  हि मोहीम वन विभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे शार्पशूटर अजय मराठे व त्यांची चमू यांनी केली आहे. यावेळी ब्रह्मपुरी वनविभागाचे  सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश अहुजा व वन कर्मचारी उपस्थित होते सदर वाघाला चंद्रपूर येथील टी टी सी सेंटर येथे पाठविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!