सौ. सीमाताई विजय लोणबले यांची काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी
मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीत सौ. सीमाताई विजय लोणबले यांची काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी
मूल : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी हालचाली वेग घेत आहेत. प्रभाग क्रमांक 07 मधून सौ. सीमाताई विजय लोणबले यांनी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे.
सीमाताई लोणबले या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून महिलांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मनमिळावू स्वभाव, सेवा वृत्ती आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे त्या परिसरात लोकप्रिय आहेत.
त्या प्रा. विजय लोणबले यांच्या पत्नी आहेत. प्रा. लोणबले हे समता परिषद, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला एक ओळखलेला चेहरा आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा दांडगा प्रभाव असून दोघांचा जनसंपर्क व्यापक आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये सीमाताई लोणबले या सक्रिय, कर्तृत्ववान आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणाऱ्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्या प्रभाग क्रमांक 07 मध्ये प्रभावी स्पर्धक ठरतील, अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!