शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीकरता जवस पिकाची लागवड करा

डॉ. बिना नायर,वरीष्ठ जवस पैदासकार ,कृषी महाविद्यालय नागपूर यांचे आवाहन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - यावर्षी संपूर्ण खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन ,कापूस व भात पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये  रब्बी हंगाम मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरता तेलबिया पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन जवस व मोहरी संशोधन प्रकल्प,कृषि महाविद्यालय नागपूर येथील वरीष्ठ जवस पैदासकार डॉ.बिना नायर मॅडम यांनी केले.
  वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडळ कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चारगांव( बु.) येथे कृषी विभाग वरोरा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने जवस पीकाबद्दल शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. बिना नायर यांनी जवस पिकाच्या लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करताना सांगितले की,जवस पीक कमी कालावधीचे,जास्त पाण्याची आवश्यकता नसणारे पीक असून रासायनिक खते व कीटकनाशकाचा कमी वापर असल्याने उत्पादन खर्च कमी व उत्पन्नात जास्त नफा मिळतो तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.प्रशिक्षणाचे उदघाटक वरोरा उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे मॅडम यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावात डीबीटी पोर्टल वर मोठ्या प्रमाणात  विविध योजनेकरिता अर्ज करावे तसेच महाविस्तार अँप मोबाईल वर डाउनलोड करून कृषी संबंधित माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले, स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेगांव येथे तेलबिया प्रकल्प युनिट सुरू झाले असल्याने शेतकरी उत्पादक कंपनी च्या भाग धारकांना मोहरी, जवस,करडई,तीळ,सुर्यफुल व भुईमुंग या तेलपिकाची लागवड वाढविण्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन प्रकल्प संचालक आत्मा,चंद्रपूर अरुण कुसळकर  यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. प्रशिक्षणार्थी शेतकाऱ्यासोबत संवाद साधताना तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांनी जवस पिकापासून निर्मित शुध्द खाद्यतेल आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे याचे महत्त्व सांगितले व उत्पादित मालाला योग्य बाजारभाव व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी दिली.शेगांव बु. चे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की , मागील पाच वर्षांपासून शेगांव बु मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध गावामध्ये जवस लागवड क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यश मिळाले असल्याचे व  सोबतच आरोग्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना स्वयंनिर्मित खाद्य तेल वापरण्यास प्रोत्साहित केल्याचे सांगितले  व यापुढे सुध्दा वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चारगाव बु.,राळेगाव,पिंपळगाव, अकोला,वडधा माल, वायगाव भो,वायगाव खडतकर,बेंबाळ तु इत्यादी गावांत जवस संशोधन प्रकल्प, नागपूर यांच्या माध्यमातून यावर्षी १०० एकरावर जवस पिकाचे प्रात्यक्षिक राबवून क्षेत्र वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण शेतकरी  मधुकर भलमे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास प्रमुख अतिथी म्हणून वायगाव भोयर येथील कृषी भूषण शेतकरी सुरेश पाटील गरमडे व अंबुजा फाउंडेशनचे बाबा लिंगायत यांनी  उपस्थित राहून उत्तम कापूस विकास कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या लोभस वाणीतून महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी उत्पादक कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी  भालचंद्र थुल यांनी व आभार प्रदर्शन शेगांव बु. चे उपकृषी अधिकारी  प्रफुल आडकीने यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी उप कृषी अधिकारी गजानन सवंडकर, सहाय्यक कृषी अधिकारी  वैभव साळवे,माधुरी राजूरकर, मनीषा तुराणकर,आशुतोष धुडसे,आकाश राठोड,जयदीप मोरे व जवस संशोधन प्रकल्प, नागपूर चे नंदकिशोर टेकाळे याचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणास शेगांव बु.परिसरातील १५० शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!