Braking मुल नगराध्यक्ष पदासाठी पहिली उमेदवार जाहीर

मूल नगराध्यक्ष पदासाठी टीना राज ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून अधिकृत उमेदवारी जाहीर

मूल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून मूल नगराध्यक्ष पदासाठी सौ. टीना राज ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम आणि जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या हस्ते ही घोषणा करण्यात आली.

विशेष म्हणजे, टीना ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा थेट मातोश्री येथून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या उमेदवारीला पक्षातील वरिष्ट नेतृत्वाचा थेट पाठिंबा लाभला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूल शहरातील राजकीय वातावरणात या घोषणेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून, नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेने आघाडी घेतली आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, टीना ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेने एक मजबूत आणि लोकप्रिय उमेदवार मैदानात उतरवला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेनेच्या या घोषणेमुळे आगामी मूल नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे. आता इतर पक्ष कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!