प्रभाग तीन मध्ये अमोल बच्चूवार यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
प्रभाग तीन मध्ये अमोल बच्चूवार यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा — भाजपा कडून तगडी दावेदारी!
मूल – प्रभाग क्रमांक तीन मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अमोल बच्चूवार यांचे. मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्वाचित संचालक, सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उद्योग आघाडीचे सचिव म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्थानिक प्रश्न सोडविण्यापासून ते तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की — अमोल बच्चूवार यांनी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण गटातून उमेदवारी करावी.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चूवार यांनी पक्षाकडे आपली अधिकृत दावेदारी दाखल केली असून, त्यांना उमेदवारी दिल्यास ते प्रभाग तीनमधून भाजपा चे सबळ आणि लोकप्रिय उमेदवार ठरतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत व्यक्त केला जात आहे.
भाजपामध्येही त्यांच्या कार्यशैलीचा व लोकसंपर्काचा उत्तम ठसा असल्याने, स्थानिक राजकारणात या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत अमोल बच्चूवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे प्रभाग तीन मध्ये भाजपाची बाजू अधिक मजबूत होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
📍 — पब्लिक पंचनामा, मूल



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!