नागपूरला उद्या होणाऱ्या महामोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावे

प्रहार कार्यकर्ता अक्षय  बोंदगुलवार यांचे आव्हान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - नागपूर येथे 28  ऑक्टोबर मंगळवारी महाएल्गार मोर्चा बच्चू कडू तसेच शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात होत असुन शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, भूमिहीन, कामगार मच्छीमार, यांच्या हक्काची लढाई असून सर्वांनी या महामोर्चा मध्ये सहभाग दर्शवून हक्काची लढाई लढण्याची आव्हान शेगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांनी केलेली आहे.यासाठी गावागावात शेत शिवारात महाएल्गार मोर्चाचा प्रचार,प्रसिद्धी करून प्रहार कार्यकर्ते अक्षय बोंदगुलवार तसेच इतर कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाऊन नागपूर येथे मंगळवार ला होणाऱ्या महाएलगार मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!