भानुसखिंडी मुंडा बंधारा बांधकामासाठी मुहूर्त कधी मिळणार
निधी प्राप्त होऊन सुद्धा बंधारा बांधकाम ठप्प
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले आदिवासी अर्जुनी तुकुम गाव असुन या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे या गावालगत भानुसखिंडी मुंडा बंधारा बांधकाम करण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा ठेकेदाराला भानुसखिंडी मुंडा बंधारा बांधकामासाठी अजून पर्यंत मुहूर्त मिळाला नसल्यामुळे या बंधारा बांधकामाला मुहर्त कधी सापडनार असा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे.
गावातील शेतकऱ्यांकडून भानुसखिंडी मुंडा बंधारा बांधकामासाठी माजी सभापती राजुभाऊ चिकटे यांना वारंवार मागणी केली असता राजुभाऊ चिकटे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी आमदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांना मागणी केली होती, प्रतिभा धानोरकर आमदार असताना शासनाकडून 1 कोटी 40 लाख 88 हजार 118 रुपये निधी( फंड) मंजूर झाला असून सुद्धा संबंधित ठेकेदाराला अजून पर्यंत भानुसखिंडी मुंडा बंधारा बांधकाम सुरू करण्यात आला नाही आहे.
या बंधार्याच्या बांधकाम झाल्यास परिसरातील अर्जुनी, तुकुम, कोकेवाडा, किनाळा, सोनेगाव, आष्टा, या गावातील हजारो हेक्टर शेती बारमाही ओलीताखाली होउन शेतकऱ्यांना शेत पिके घेण्याकरीता सोयीस्कर होते, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होण्यास मदत होईल, दरवर्षी लाखो लिटर पाणी पावसाळ्यात चंद्रपूर इरई डॅमला जात असून परिसरात या पाण्याची प्रशासनाने साठवूनक केल्यास छोटा प्रकल्प निर्माण करून युवकांना रोजगार प्राप्त होण्यास ठरणारा आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!