नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी तळोधी बा. वनपरीक्षेत्र कार्यालयावर आकापुर , येथील ग्रामस्थाच्या वतीने,तथा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आंदोलन

नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी तळोधी बा. वनपरीक्षेत्र कार्यालयावर आकापुर ,  येथील ग्रामस्थाच्या वतीने,तथा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आंदोलन



तळोधी बा -- 
नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासुदेव सितकुरा वेटे वय ५८ वर्ष याला शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान शेतावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार मारल्याने जनता भयभीत झाली आहे. तसेच रविवारच्या रात्री आकापूर गावालगत वाघाने कुत्रीवर हल्ला केल्याने कुत्री गंभीर जखमी झाली . तसेच दिवसाढवळया वाघाचे सावर्ला आकापूर मार्गावर दर्शन होत असल्यामुळे आकापूर, गंगासागर हेटी, उश्राळमेंढा, सावर्ला व लखमापूर परीसरातील जनता भयभीत झाली आहे. सध्या हलक्या धानाची कटाई व जड धानासाठी शेवटची पाण्याची आवश्यकता असल्यामुळे या परिसरातील शेतकरी शेतमजुराना शेतावर जाणे आवश्यक असताना सुध्दा वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना धोक्याचे ठरले जात आहे. त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतावरील धान कापणीला वेग आले असताना महिला मजूर वर्ग सुध्दा‌ वाघाच्या दहशतीमुळे शेतावर काम करण्यास नकार देत आहे. त्यामुळे आज नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे याकरीता शिवाजी चौक तळोधी बा. येथून‌ मुख्य मार्गाने वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा आणून आंदोलन करण्यात आले. यावेळी नरभक्षी वाघाला तीन दिवसात जेरबंद करा अन्यथा यापेक्षाही मोठा जण आंदोलन उभारण्याचे  ग़्रामस्थाच्या वतीने म्हटले आहे. यावेळी आकापूर, येथिल  ग्रामस्थ, शेतकरी संघटना, तालुका काँग्रेस कमेटीच्या  वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी लक्षमी शहा यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी‌ माजी जि. प. अध्यक्ष सतिशभाऊ वारजूरकर, माजी सभापती प्रणयाताई गड्डमवार, नागभीड क्राग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, आकापूर संरपंच कुणाल गहाणे, गंगासागरहेटी माजी संरपंच दिलीप गायकवाड, , खुशाल मदनकर, येनोली सरपंच अमोल बावनकर, राहुल मदनकर, मोनील देशमुख, यांची यावेळी उपस्थिती होती. यां आंदोलनात महिला  व शेतकरी वर्गाची मोठया संख्येने उपस्थिती होती. 
कोट
      सध्या शेतीचे धान कापणीचे हंगाम सुरु झाले असून वाघाच्या दहशतीमुळे मजूर वर्ग शेतावर जाण्यास घाबरत आहे.अशा परिस्थितीत वनविभागाच्या वतीने अजूनही वाघाला जेरबंद केले गेले नाही. त्यामुळे ग्रामस्थाच्या वतीने जन आंदोलन करुन वनविभागाला तीन दिवसात वाघाला जेरबंद करा अन्यथा ब्रम्हपुरी उप वनविभागj कार्यालयावर याहीपेक्षा मोठा जन आंदोलन करण्याचा अल्टीमेटम  वनविभागाला देण्यात आला आहे. 
      डॉ.सतिश वारजूकर
माजी जि. प. अध्यक्ष चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!