शेतकऱ्यामध्ये वनविभाच्या विरोधात संतापाची उसळली लाट

शिवरा येथील वाघाच्या हल्यात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यु नंतर वनविभागाच्या विरोधात शेतकऱ्यानी कांपा - चिमुर रोड वर केला रास्ता रोको आंदोलन

२४ तासात वाघांचा व अन्य प्राण्याचा बंदोबस्त करा

चिमुर वनपरिक्षेत्र अथिकाऱ्यानी वाघाचा बंदोबस्त करण्याची दिली ग्वाही

तीन दीवसात वाघांचा बंदोबस्त करा नाही तर चौथा-पाचव्या दिवसी यांच्या पेक्षा मोठा रस्ता रोखो आंदोलन करणार - माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा शिवरा येथील माजी सरपंच निलकंट भुरे यांना दि.26/10/2025 ला सायंकाळी अंदाजे 5:00 वाजता च्या सुमारास त्यांच्या स्वताच्या शेतातमध्ये वाघाने हल्ला करून जाग्यावरच ठार केल्याची घटना घडली. दि.28/10/2025 ला शेतकरी,नागरीक व आजी-माजी सरपंचा कडून चिमुर, कांपा, डोमा, शिवरा चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.असुन या आंदोलनात शेतकऱ्या कडून मोठ्या प्रमाणात सात मिळाली. या आंदोलनात महीला शुध्दा मोठ्या प्रमाणा उपस्थिती होती.
  या आंदोलनात शेतकऱ्यामध्ये वनविभागाच्या विरोधात संतापाची लाट होती. तात्काल वाघांचा व वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा व आपले वन्यप्राणी आपल्या जंगलात ठेवा स्वतः त्यांची राखन करा आम्हच्या शेतामध्ये वाघ व कोणत्याही प्रकारचे वन्य प्राणी येऊ नये.आम्ही जर जंगलातुन एक लाकूड आणले तर आम्हच्या वर कार्यवाही करता.शेतासेजारी झाडणी तोडली तर आम्हा कडून पैसे मागता, शेरक्याच्या कुत्र्याने ससा पकडला त्याच्या कडून पंधरा ते विस हजार घेता व येवड्या प्रमाणात इलेस्ट्रीक च्या दंड्या मारता की तो व्यक्ती एका महीण्यात मरण पावतो.आम्हच्या शेतात वाघाच्या भितीने मजुर मिळत नाही.तुम्हचे गार्ड आम्हच्या शेतात येऊन शेतीचे काम करणार का अश्या प्रकारे शेतकऱ्याचा रोष वनविभागाच्या विरोधात पाहायला मिळाला.
वनविभाचे अधिकारी व कर्मचारी प्राण्याची पेट्रोलींग करीत नसतात तर रोडणी येणारे रेतीची ट्रॅक्टर ची वाट बगत असतात व हजारो,लाखो रूपये कमवीत असतात.जंगलातील नदी-नाल्यातील रेती तस्कराना पकडत नसतात पण रोडच्या ट्रॅक्टर पकडून हजारो रूपये घेऊन सोडत असतात. चार-पाच दिवसा अगोदर रात्रो ला शिवरा रोड वर दोन रेती ट्रॅक्टर पकडण्यात आले होते त्यांच्या कडून एक लाख रूपय घेऊन ट्रॅक्टर सोडण्यात आल्याची अशी चर्चा होत आहे.अश्या प्रकारचे उदा.शेतकरी व नागरीका कडून पाहायला मिळाले बऱ्याच गोष्टीची सत्यता नाकारता येत नाही.या परीसरात वाघा ची दहसत असल्यामुळे शेतकरी व नागरीकामध्ये भितीचे वातावरण आहे. एका महीण्यात हि दुसरी घटना आहे.व पाळीव प्राण्यावरही चार-पाच घटना घडल्या आहे. हा वाघ नरभष्य असल्याने यास ठार मारण्यात यावे अशी नागरीका कडून त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.सतीश वाजुरकर यांनी मनोगतात वाघाचा बंदोबस्त केला नाही तर तीन ते चार दिवसात याच्या पेक्षा मोठा आणि तीव्र चका जाम व रस्ता रोखो आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा वनविभागास देण्यात आला.या अगोदर सुध्दा आंबोली चौरस्त्यावर वनविभागा द्वारे लेखी आश्वासने देण्यात आली होती.सात दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल पण आतापर्यंत काही झाला नाही.त्या वेळी या क्षेत्राचे स्थानिक आमदार उपस्थीत होते.आमदाराला शेतकऱ्याची किंवा नागरीकाची काहीच चिंता नाही.नागरीकापेक्षा वाघाला जास्त किंमत सरकार व मंत्री,आमदार देत आहे.चिमुर वनपरीक्षेत्र अधिकारी देऊरकर यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन जनतेला दिले.आम्ही शाप शुटर तयनात केले आहे.
या घटनास्थळी पोलीसांचा चोक बंदोबस्त होता.हा आंदोलन शिवरा येथील सरपंचाच्या नेतृत्वात करण्यात आला.यावेळी शेकडोच्या संख्येने गावकरी तथा शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!