दलित नागरिकांच्या घरासमोर अंधार
अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतचे अक्षरशः दुर्लक्ष
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला अर्जुनी तुकुम हे गाव असुन जवळपास दोन हजार वस्तीचे गाव आहे. हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असुन या गावात काही दलित समाज बांधव राहत असून त्यांच्या घरासमोर नेहमीच अंधारमय वातावरण असते ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागत आहे.
अर्जुनी या गावात दलित समाजाचे कुटुंब राहत असून त्यांच्या घरासमोर एक इलेक्ट्रिक पोल असुन दिवाळी सारखा सण जाऊन सुद्धा या इलेक्ट्रिक खांबाला अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे लाईट लागलेला नसून आजही रात्रीच्या सुमारास नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे असून ठीक ठिकाणी गंदगी पसरलेली आहे काही दिवसाअगोदर या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एक विषारी साप निघाला असून रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतच्या निष्काळजी पणामुळे मच्छर, किडे, सरपटणारे प्राणी यांच्या पासून येथील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेले आहे.
नेहमी सणासुदीच्या काळात तालुक्यातील ग्रामपंचायत कडून गावातील इलेक्ट्रिक खांबाला लावण्याकरीता हजारो रुपयाची लाईट घेण्यात येत असतात मात्र हे लाईट लावण्याचे काम मात्र होत नसून हे लाईट कुणाच्या घरी जात आहे असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिकांच्या मनात पडलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!