शेताच्या कुंपणातील विद्युत प्रवाहाने एका इसमाचा व नील गाईचा मृत्यू
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला कुंपणाला स्पर्श होऊन विद्युत प्रवाहने एका व्यक्तीचा व एका नील गाईचा मृत्यू झाला सदर घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली असुन 27 ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली
वरोरा तालुक्यातील चरूर खटी येथील कवडू शंकर मोडक वय पन्नास वर्ष हा बकऱ्या चारण्याकरिता शेत शिवारात गेला होता वामन तुळशीराम धाबेकर यांच्या शेतातील कुंपणांमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता कुंपणाला स्पर्श झाल्याने कडू मोडक याचा मृत्यू झाला मृतक संध्याकाळी घरी आला नसल्याने त्याची शोधाशोध घेण्यात आली तेव्हा 27 ऑक्टोबरला त्याचा मृतदेह आढळून आला याच कुंपणातील विद्युत प्रवाहने नील गाईचा मृत्यू झाल्याची घटना त्या शेतात उघडकीस आली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून मृत निलगाय ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात येणार आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी दिली या घटनेचा तपास वरोरा पोलीस व वीज वितरण कंपनीचे ग्रामीण विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!