आठ फुटी अजगराला जीवदान
सिंदेवाही वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोनखैरी येथे गावतलाव वरील महिलांच्या धोबीघाटावर असलेल्या अंदाजे सात ते आठ फूट लांबीच्या व आठ ते दहा किलो वजनाचे अजगराला स्वाब बचाव दल व वनविभागाने रेस्क्यू केले.
सविस्तर वृत्त असे की लोनखैरी येथे गावतलाव वरील महिलांच्या धोबीघाटावर धुनी धुवायला गेलेल्या महिलांना एक मोठा साप निदर्शनास आला. या बाबतीत सिंदेवाही वन परिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार/बोरावार यांना या बाबतीत माहिती देण्यात आली.
यानंतर स्वाब चे बचाव दल यांना या बद्दल माहिती दिली व नंतर स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार/बोरावार यांच्या उपस्थिती मध्ये स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, व अध्यक्ष यश कायरकर यांनी अजगराला सुरक्षित पकडून नंतर शेतकऱ्यांना अजगरा बद्दल सांगताना बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला. "कारण अजगर साप हा घोणस प्रमाणेच थोड्याफार प्रमाणात दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. असे करू नये अजगर हा संरक्षित प्राणी असून तो 'शेड्युल वन' मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे आणि अजगर हा माणसांना गिळून टाकतो अशा अफवा आहेत मात्र त्याचा कुठलाही आजपर्यंत ठोस पुरावा आपल्या भारतामध्ये आढळून आलेला नाही. त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संखेत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर वन विभागाला किंवा आम्हाला कळवा, मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका."
"पावसाळ्याच्या सीझनमध्ये बिडात व परिसरात पाणी घुसल्यामुळे गावात घरामध्ये साप घुसण्याच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे जर घर परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये व त्या सापाला मारण्याऐवजी सर्पमित्रांनाच प्राचारण करावे. सर्प दंश झाल्यास कोणत्याही मांत्रिका कडे जाऊन आपला जीव गमावण्याऐवजी शासकीय रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावा. (सापाचा जहर प्रतिरोधक) अँटिस्नेकव्हेनन्स घ्याव्या. असे या वेळी गावातील उपस्थित लोकांना यश कायरकर यांनी सांगितले.
यानंतर या अजगराला परिसरातील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले. यावेळी सिंदेवाही च्या वन परिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार/बोरावार मैडम, वनरक्षक राहुल धनविजय, वन रक्षक कु. पी.ए. वाघमारे मैडम, स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, व अध्यक्ष यश कायरकर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!