सावलीचे तहसीलदार शेतपिकाची पाहणी करण्यासाठी बांधावर - अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकाची केली पाहणी

 

सावली - पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सर्वदूर पावसाचा कहर सुरु आहे. सावली तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने येथील धान आणि कापूस पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. बुधवारbपासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले, ज्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असून हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे शेतकरी फार आर्थिक अडचणीत सापडला आहे. चांदली बुज. परिसरात पिकाच्या नुकसानीची पाहणी तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी बांधावर जाऊन केली.

        सावली तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक भिजल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. बुधवारपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पावसाने सावली तालुक्यातील फार नुकसान झाल्यामुळे तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी माजी सभापती विजय कोरेवार, पोलीस पाटील चिंतामण बालमवार, विलास येनगंटीवार, विकास पुपरेड्डीवार, राकेश गुंडावार, श्रावण पा. गुरनुले, तलाठी वैभव निशांकर आदिसह शेतकरी उपस्थित होते.

शेतपीक नुकसानी चे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांचे मार्फत करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा आपल्या झालेल्या पिकाचे नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी द्यावी. तालुका प्रशासनाशी सहकार्य करावे 

प्रांजली चिरडे

तहसीलदार सावली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!