मूलमध्ये शिक्षकाची आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात हळहळ
मूलमध्ये शिक्षकाची आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात हळहळ
मूल (प्रतिनिधी)
मूल शहरातील बालविकास प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक विनोद हरमवार (वय 40) यांच्या निधनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शिक्षक समाजात शोककळा पसरली आहे. विवेक हरमवार यांनी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्यात त्यांचे निधन झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबीय काही दिवसांपासून बाहेरगावी होते. आज शाळा सुरू असूनही विवेक हरमवार शाळेत उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर सहकारी शिक्षकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या नातेवाइकांनी घरी जाऊन पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
विवेक हरमवार हे शहरातील मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---
❗ महत्वाची सूचना
मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येणे ही गंभीर पण उपचारयोग्य स्थिती आहे. मदत मागणे ही कमजोरी नसून आवश्यक पाऊल आहे.
📞 आसरा हेल्पलाईन (भारत) : 91-9820466726
📞 किरण हेल्पलाईन (भारत सरकार) : 1800-599-0019



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!