अप क्रमांक- 171/2025 कलम 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, कलम 11(1)(ड),(फ) प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम 1960
अप क्रमांक- 171/2025 कलम 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, कलम 11(1)(ड),(फ) प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम 1960
दिनांक 31/10/ 2025 रोजी चे रात्री 02:30 ते 03:30 वा. चे दरम्यान मुकबिराच्या खात्री खबरे द्वारे पोलीस स्टेशन तळोदी हद्दीतील मौजा बाळापूर रेल्वे गेट जवळ पंचासह नाकेबंदी केली असता पोलिसांना पाहून केसरी रंगाचा आईसर कंपनीचा ट्रक क्रमांक टी जी 12 टी 4077 चा अज्ञात चालक आपले ताब्यातील वाहन रस्त्यावर उभे करून जंगलात पळून गेला, पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून आल्याने पोलीस स्टाफनी पंचा समक्ष वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे मागील लोखंडे डाल्यामध्ये एकूण 30 नग गोवंश जनावरे किंमत 2,45,000/-रु. व एक केशरी रंगाचा जुना वापरता आईसर कंपनीचा ट्रक मॉडेल नंबर प्रो 1114 XP क्रमांक टी जी 12 टी 40 77 किंमत अंदाजे 10,00,000/-रु असा एकूण 12,45,000/-रु. चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष पंचनामा जप्ती कार्यवाही करून ताब्यात घेऊन पोस्टला येऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी राकेश जाधव साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन तळोदी ठाणेदार सपोनि राहुल गुहे यांचे नेतृत्वात पोउपनि किशोर मानकर, पोहवा सचिन साखरकर/2488, पोअ अजय निखाडे/494, चापोअ सोनल पोपटे/6036 यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनी किशोर मानकर पो स्टे तळोधी करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!