सावली शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे द्या - नगराध्यक्षसह पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

  

सावली - शहरातील अनेक प्रभागातील कुटुंब कित्येक वर्षापासून शासकीय जागेवर घरे, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. मात्र पट्टे नसल्याने अडचणी येत असल्याने त्यांना पट्टे देण्याबाबत कार्यकाही करण्याचे निर्देश क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले होते.  त्यानुसार अतिक्रमणधारकांची यादी नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा साधना वाढई यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी तहसीलदार यांचेकडे देत पट्टे देण्याची मागणी केली. 

      सावली शहरात अनेक कुटुंब कित्येक वर्षांपासून सरकारी जागेवर घरे, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. मात्र कायमस्वरूपी पट्टे नसल्याने घरकुल व इतर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना माहिती दिल्यानंतर घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक असल्याने याबाबत कारवाई करण्याचे निर्देश नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी संदिप दोडे व उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांना दिले. त्यानुसार अतिक्रमणधारकांची यादी तहसीलदार यांचेकडे देत पट्टे देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देताना सावली शहरातील नगराध्यक्ष साधनाताई वाढई, उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपवार, नगरसेवक रस्से, सचिन संगिडवार, प्रीतम गेडाम, अंजली देवगडे, सिमा संतोषवार, ज्योती शिंदे, प्रियंका रामटेके, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राऊत कृष्णा राऊत तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!