नळाद्वारे प्रत्येक घरात असंख्य नारू
नवेगाव पुनर्वसन येथील घटना ; गावकऱ्यांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील खडसंगी जवळील हाकेवर असलेल्या नवेगाव पुनर्वसन येथील प्रत्येक घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे नारू सदृश्य पाणी आले असल्याने समस्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष निर्माण करीत नविन पिण्याच्या पाण्याची टाकी न नळ बांधकाम करावे किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बांधकाम करावे अशी मागणी केली आहे.
नवेगाव पुनर्वसन येथे जवळपास १२० कुटुंब राहतात. यातील जवळपास १११ घरातील कुटुंबाकडे हर घर जल हर घर नल ही योजना कार्यान्वित आहे. हे गाव मागील दहा बारा वर्षांपूर्वी खडसंगी जवळ पुनर्वसन झाले. तेव्हा पासून या गावात एक पाण्याची टाकी बनविण्यात आली. त्यामुळं या गावातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या एकाच टाकीचा उपयोग होत असतो. जर का कधी कोणत्या कारणाने नळ बंद राहिले तर मात्र पिण्याच्या पाण्याचे वांदे होत असतात. आता नव्याने जल जीवन मिशन अंतर्गत या गावात बोर मारून याचे कनेक्शन जुन्या टाकीलाच जोडण्यात आले. जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून "हर घर जल हर घर नल" या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रत्येक घरी नव्याने नळ कनेक्शन द्यायला पाहिजे मात्र असे न करता जुनेच नळाद्वारे पाणी येत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. आज या प्रत्येक घरी १०० मिली पिण्याच्या पाण्यात असंख्य असे पिण्याच्या पाण्याद्वारे नारू आलेले आहेत. यामुळ गावात पिण्याच्या पाण्याने कोणती साथ तर उद्भवणार नाही ना अशी शंका गावकऱ्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळं या नळाद्वारे येणाऱ्या नारू सदृश्य पाण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा. व जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावात नविन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे. तसेच गावात वॉटर फिल्टर लावून देण्यात यावे. अशी मागणी समस्त नवेगाव पुनर्वसन येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायत येथील सरपंच यांना निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदन देताना नंदकिशोर चौधरी, निखील चौखे, हरिदास धारने, मोरेश्वर नन्नावरे, संदीप चौखे, अमोल सोनवणे, दामोदर चौधरी, आशिष शेंडे, गंगाधर मेश्राम, हरिदास भोयर, ताराचंद बारेकर, रोशन चौधरी, विनोद नन्नावरे, राजू चौखे, देवाजी दडमल, राहुल नेहारे, अंकित धारणे, प्रफुल चौखे, प्रफुल चौधरी, आकाश शेंडे आदी गावकरी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यात असंख्य नारू सदृश्य पाणी येत असल्यामुळं ही गंभीर बाब आहे. याबाबत आपण सर्वत्र पाईप लाईन तपासणी करून या नळाद्वारे येणाऱ्या नारू सदृश्य पाण्याचा लवकरच बंदोबस्त करू.
अनिल नन्नावरे
सरपंच नवेगाव पुनर्वसन


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!