शेतकऱ्यांनी तहसीलदारांना अवकाळी पावसामुळे धान, कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत चे दिले निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२९ ऑक्टोबर २०२५ ला झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने चिमूर तालुक्यात फार मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या कापूस ,धान , सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटाका बसलेला असुन अतोनात नुकसान झाले आहे.पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने धान उत्पादक शेतकरी पुर्णपणे हवालदिल होत असल्याने शासनाने तातडीने  नुकसानीचे सरसकट त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महाएल्गार मोर्चाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत आहोत. महाएल्गार मोर्चा यांनी घेतलेले प्रश्न आणि मागण्या या समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि आवश्यक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आंदोलनात नैतिक व सामाजिक पाठिंबा जाहीर करीत आहोत. आपल्या न्याय मागण्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा, ही आमची मागणी आहे. निवेदन देत असतांना शेतकरी सुभाष दडमल, निखिल जिवतोडे, दिपक नन्नावरे, प्रकाश गायकवाड, भास्कर बदके,चेतन राने, गजानन बुटके, संदिप धारणे, अनिल रामटेके, अविनाश रामटेके,गजानन बुटके, शांताराम शेलवटकर, संदिप धारणे व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!