तब्बल ३१ वर्षांनंतर कोरंभी, खाकसी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न।
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - तब्बल ३१ वर्षांनंतर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरंभी (खाकसी) ता. पवनी, जि. भंडारा येथे इयत्ता चौथीमध्ये एकत्र शिकलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी पुन्हा एकदा एकत्र जमले. १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता चौथीतील वर्गमित्रांचा स्नेहमेळावा व शिक्षक सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या खास दिवशी, जुने वर्गमित्र बालपणाच्या आठवणींनी भारावून गेले. एकत्र जमून त्यांनी जुने दिवस आठवले, शालेय जीवनातील गमतीजमती सांगितल्या, आणि आयुष्यातील प्रवास शेअर केला. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटत असल्यामुळे वातावरणात उत्सुकता, आनंद आणि हर्षोल्हास भरलेला होता.
शिक्षकांचा सन्मान - एक भावनिक क्षण
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे १९९४ मध्ये इयत्ता चौथीला शिकवणाऱ्या त्यावेळचे मुख्याधापक असलेले श्री. डी. एस. मेश्राम सर, वर्गशिक्षक श्री. जे.एस. आंबिलड्डुके सर, स्वर्गीय श्री. प्रदीप कावळे सर यांच्या पत्नी कावळे मॅडम, तसेच आताचे कोरंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बि.बि. खाटीक सर, व मेश्राम सर, शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष, श्री. महादेव चचाणे इ. आदरणीय शिक्षकांचा सत्कार सोहळा. आपल्या बालपणीच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या या गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतेने गौरव केला. शिक्षकांनीही आपल्या शिष्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व आशीर्वाद दिला.
कार्यक्रमाची रूपरेषा
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर जुन्या आठवणींवर शिक्षक विदयार्थी यांच्या मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आला. सहभागी मित्रांनी आपले अनुभव शेअर करताना बालपण, शिक्षकांचे धडे, शिक्षणाची शिस्त आणि मैत्रीच्या गाठींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. काही विद्यार्थ्यांनी कविता, गाणी, आणि हास्यप्रद किस्स्यांद्वारे वातावरण हसत-खेळत ठेवले.
सदर स्नेहमेळावा कार्यक्रमाकरीता बेंच १९९३-९४ मध्ये जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कोरंभी मध्ये शिक्षण घेतलेले मुली प्रियंका सुदामे, अश्वीनी धनविजय, वर्षा कंगाले, नलु इरपाते, विणा शेरकुरे, मिना शेरकुरे, सुकेशनी सुदामे, ज्योती शेरकुरे, प्रिती धनविजय, प्रमिला येवले, सुषमा धनविजय मुलामध्ये महेश राउत, बाळु कंगाले. सुधाकर बनकर, जसवंत धनविजय, शैलेश नागदेवे, होमराज पचारे, राजेश कंगाले, विनोद सेंद्रे. हेमराज कावळे, हेमंत आंबेडारे, भारत वरठे, स्वपनील माटे इ. माजी विदयार्थी उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेत, पुन्हा भेटण्याचे वचन दिले. हा स्नेहमेळावा म्हणजे जुन्या आठवणींचा, नात्यांचा आणि गुरु-शिष्य परंपरेचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
आभार आणि पुढची दिशा.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रियंका सुदामे भैसारे, अश्वीनी धनविजय, विनोद सेंद्रे, महेश राउत, बाळु कंगाले, सुधाकर बनकर यांच्या पुढाकाराने व सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुढील काळात दरवर्षी असा स्नेहमेळावा घेण्याचा संकल्प केला.


कोरंभी शाळेची स्नेहमिलन वशिक्षक सन्मान सोहळ्याचीबातमी प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद .श्री जे .स
उत्तर द्याहटवा.आंबीलडूके सेवानिवृत उच्च श्रेणी मुख्याधापक (कोरंभी सेवाकाळ १९८८ ते २००६ )🌹🌹🌹🌹🌹
Batmi prakashit kelyabaddal aani ha sohala ghadavun aanlyabaddal khup kup dhanyawad-shri D S.Meshram guruji pauni
उत्तर द्याहटवा