आंबोली परिसरातील वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून तात्काळ स्तलांतरन करा
आठ दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास आंबोली चौरस्ता येथे "रास्ता रोको ठिय्या आंदोलन" करणार - शुभम मंडपे
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - आंबोली,चिचाळा (शास्त्री), लावारी, वाकर्ला, जवराबोळी गडपिपरी,बोरगाव (डोये)पूयारदंड परिसरात 15 दिवसापासून वाघाचा धुमाकूळ चालु आहे. दिनांक 18 सप्टेंबर ला मौजा लावारी येथील विद्या कैलास मसराम ह्या महिलेला वाघाने ठार केले होते त्यामुळे शेतकरी व शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच दिनांक. 26/09/2025 ला मौजा आंबोली चौरस्ता येथे वाघाने एका गाईला ठार केले व दुपारी 2 वाजता मौजा चिचाळा (शास्त्री) येथे विनायकजी वासनिक यांच्या शेतात वाघाने नीलगायीची शिकार केली व आंबोली परिसरात 15 दिवसापासून सतत वाघाचे दर्शन होत आहे त्यामुळे खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजनयुवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य यांनी तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा याची मागणी क्षेत्र सहाय्यक वनविभाग भिसी यांना केली आहे.यावेळी तीन प्रमुख मागण्या निवेदनातून केल्या आहेत, संपूर्ण वाघाचे स्तलांतरन दुसऱ्या जंगलात करावे व मौजा लावारी गावाच्या सभोवताल तारेचे कंपाउंड करण्यात यावे व आंबोली, चिचाळा(शास्त्री),गडपी परी, पूयारदंड गावालागतच्या जंगलाला तारेचे कंपाउंड करण्यात यावे याची मागणी वनविभागाला केली आहे.या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास वनविभागाला आठ दिवसाची अल्टीमेट देऊन, सर्व परिसरातील शेतकरी व शेमजूरांना घेऊन आंबोली चौरस्ता येथे "रास्ता रोको ठिय्या आंदोलन" करणार असा इशारा वनविभागाला दिला आहे.यावेळी क्षेत्र सहाय्यक भिसी नैताम सर यांना निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रा.प. सदस्य शुभम मंडपे,राजेद्र जाधव, वैभव ठाकरे, योगेश करारे,दिनकरजि सीनगारे,प्रणय ठाकरे,संकेत पारधी,अनंता डोये, सुधाकर कुर्वे, विश्वास रामटेके,आशिष दडमल, विनोद बारेकर, संजय शिवरकर व आंबोली, लावारी, चिचाळा गडपिपरी,पूयारदंड, वाकर्ला जवराबोळी परिसरातील नागरिक उपस्तित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!