शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पास्को अंतर्गत गुन्हा दाखल

घटनेतील दोन आरोपींना तात्काळ अटक

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम  )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून दोन आरोपींना शेगाव पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे..  सविस्तर याप्रमाणे आहे की शेगाव पोलीस स्टेशनच्या जवळील शेगाव मध्ये एका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला दोन युवकांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या वेळेत छेडखानी करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार शेगाव जवळील एका खेड्यामध्ये मुलगी आई-वडील नसल्याकारणाने आजी-आजोबांचा घरी राहत असून त्याच गावातील युवक मनोज उर्फ भूषण बंडू रणदिवे वय वर्ष 27 रा.दादापूर याने पीडित मुलीला शाळेतून घरी जाताना रस्त्यात गाठून जानू चालली का, डार्लिंग चालते का, असे अभद्र शब्द वापरून भर रस्त्यात तिचा विनयभंग केला  त्यानंतर त्याचा मित्र आकाश हंसराज डोंगरे वय वर्ष 25 यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या आजी-आजोबांना शिवीगाळ करून मुलीच्या डाव्या खांद्यावर हात ठेवून चल तुझ्याशी एकट्यात बोलायचे आहे म्हणून त्या मुलीचा विनयभंग केला या सगळ्या प्रकारामुळे पीडित मुलगी अतिशय घाबरली असता तिने शेगाव पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध तक्रार केली असून शेगाव पोलीसांनी कलम 74,78,79, 333, 352  बि एन एस सह कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंद करून य दोन्ही आरोपीला अटक करून कोर्टामध्ये हजर केले आहे व घटनेचा अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांचे मार्गदर्शनात पीएसआय कांबळे हे करीत आहे.वारंवार शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अशा घडणाऱ्या घटनांमुळे शेगाव परिसरमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेतील बाबत मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा विकृत विचारांच्या नराधनांवर चाप लावण्याची सक्त गरज असल्याचे परिसरातील सज्जन नागरिकांतून बोलल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!