शेतकरी देशाचा आत्मा असुन एक उद्योजक आहे

रवींद्र शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष चंद्रपूर

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम  )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील चारगाव बु. येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे उद्घाटन भाषणामध्ये शेतकरी हा जगाचा आत्मा एक देशाचा उद्योजक असुन सहकार,सेवा सहकारी क्षेत्रात वेगवेगळ्या योजनेमार्फत शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेती विकास करावा तसेच दूध व्यवसाय, पशुपालन व्यवसाय याकडे जास्त भर देऊन शेती व्यवसायात उन्नती करून आपला आर्थिक विकास साधावा, तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना 11 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांसाठी बँक मार्फत योजना सुरू करण्यात येत असून शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.या कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, यांच्या प्रतिमेला दिप पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जयंत मोरेश्वर टेंभुर्डे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर तसेच उद्घाटक, सत्कारमूर्ती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र  शिंदे, होते तसेच प्रमुख पाहुणे संतोष आमने माजी नगराध्यक्ष भद्रावती, आशिष शुक्ला,  गणेश गणोरकर, शेतकरी नेते किशोर डुकरे, शेगाव बँक व्यवस्थापक कथलकर, दयाराम ननावरे, केशव छगन अडकिने, ठाकरे, अभिजीत पावडे, प्रभाकर हनवते, प्रमुख पाहुणे होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र चौधरी यांनी केले. तर प्रास्तावना उपाध्यक्ष अजित पावडे, आभार प्रदर्शन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष दयाराम नन्नावरे यांनी केले,या कार्यक्रमाचे यशस्वी करीता नरेंद्र गडमडे, केशव गडमडे,शंकर खाडे,विनायक दडमल,  श्रावण जीवतोडे, विजय चौधरी, इंदुमती रणदिवे, निशा चौधरी, रोशन मसराम, महेश शस्त्रकार,आदी नागरिकांनी सहकार्य केले  या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!