कर्जमाफी, तसेच विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या रस्ता रोको आंदोलन

बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन 

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - सतत नापिकीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व चंद्रपूर जिल्हा ओला  दुष्काळ जाहीर करा तसेच यलो मोजाक या रोगामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई साठी नागपूर चंद्रपूर महामार्गावर खांबाळा येथे  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी राज्यमंत्री तथा शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. दरवर्षी सतत नापिकी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कापूस ,सोयाबीनला भाव नाही त्यामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहे यावर्षी खरीप कापूस तसेच सोयाबीन अति पावसामुळे पीक निस्तनाबूत झाले आहे सोयाबीन येल्लो मोजाक या रोगामुळे हातात आलेले पीक पिवळे आले त्यामुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता संकटात आलेला आहे, कसेबसे बँकेचे कर्ज व सावकारांकडून कर्ज घेऊन शेती  शेतकऱ्यांनी उभी केली, कापूस व सोयाबीन हे पीक जोमात असतानाच अचानक अति पावसामुळे हाती आलेले सोयाबीन व कापूस हे पीक खराब झाल्याने बँकेचे व सावकारांचे कर्ज कसे फेडावे या वीवंचनेत शेतकरी बळीराजा आहे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट उभे ठाकले आहे . शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसेच चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करणे यल्लो मोजाक या रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००/- अनुदान देण्यात यावे यासाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या नेतृत्वाखाली नागपूर चंद्रपूर महामार्गावर खांबाळा येथे सकाळी दहा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आसाळा वरोरा येथील शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!