उमेद अंतर्गत स्त्रीशक्ती ग्राम संघाच्या वतीने वाढोणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
स्थानिक वाढोणा येथे स्त्री शक्ती ग्राम संघाच्या वतीने दिनांक 18 /9 / 25 ला ठीक अकरा वाजता सार्वजनिक सभागृह वाढोणा येथे, उमेद अंतर्गत स्त्रीशक्ती महिला ग्राम संघाच्या स्थापना दिनानिमित्त महिलांच्या वाढत्या आजाराची समस्या लक्षात घेऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक वाढोणा येथील सरपंच माननीय देवेंद्रजी गेडाम हे होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा, सौ शारदाताई धनंजय बोरकर अध्यक्षा, उडान प्रभाग संघ वाढोणा - गिरगाव जिल्हा परिषद क्षेत्र तथा स्त्रीशक्ती ग्राम संघ यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय एच. ए.मोहूले सर तसेच आरोग्य विभागातील संपूर्ण टीम, तथा उमेद अंतर्गत कार्यरत माननीय किशोर मेश्राम सर कृषी व्यवस्थापक, सौ. संगीता गहाणे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, सौ. सरिता ताई पाटेवार लिपिक, उडान प्रभाग संघ तथा स्त्री शक्ती ग्रामसंघ, सौ शिल्पा कापगते, आय.सी. आर. पी, सौ रागिना ताई बोरुले,कृषी सखी. सौ. वृषाली शेंडे,मस्त सखी. सौ. संगीता झोडे, पशु सखी व संपूर्ण आशा वर्कर व गावातील महिला उपस्थित राहून वैद्यकीय सेवेचा तपासण्या करून घेतल्या. त्यामध्ये एकूण जवळपास दीडशे महिलांनी यात तपासण्या करून घेतल्या. यामध्ये सिकलसेल, थायरॉईड, बीपी,शुगर, कॅन्सर अशा अनेक प्रकारच्या महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच आबा कार्ड काढण्यात आले. पहिल्यांदा या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अगोदर परिसरातील स्वच्छतेची मोहीम हातात घेऊन, वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेदीच्या सर्व महिला मंडळींनी भाग घेऊन. उमेद यशस्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमाचे संचालन शिल्पा कापगते,आय सी आर पी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सरिता पाटेवार यांनी केले.तर आभार प्रदर्शन संगीता गहाणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार देऊन करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!