शेगाव येथे मस्कऱ्या गणपतीचे थाटात विसर्जन

डिजेच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात शेगाव नगरी दुमदुमली

शेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त

तालूका : - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यातील  शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने होत असून येथील विसर्जन वरोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असुन परिसरात विसर्जन करिता नामांकित आहे विशेष म्हणजे शेगाव नगरी मध्ये " मूर्ती लहान कीर्ती महान " अशी परंपरा कायम करिता प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांचा हजारो रुपयांचा खर्च असून सर्वाधिक आपला गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल या कडे प्रत्येक मंडळाचे अधिक लक्ष असते तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , फटाक्याची आतषबाजी , सुशोभित देखावे , अश्या अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात. त्यामुळे येथे परिसरातील अनेक गणेश भक्त शेगाव नगरी मध्ये दाखल होऊन या आनंद क्षणी सहभागी होतात. गणेश भाविक भक्ताच्या सुख सोई करिता पिण्याचे पाणी , मसाले भात , भोजन दान , यांची विशेष सोय उपलब्ध करण्यात आली, गणेश विसर्जन  पाहण्याकरिता परिसरातील हजारो शेगाव मध्ये भाविक येत असल्याने या आनंदमय सुखमय क्षणी काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शेगाव येथील ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात 40 पोलीस कर्मचारी 72 होमगार्ड यांच्या ताफ्यासह चौका चौकात बंदोबस्त लावण्यात आला .
यावेळी "देव आहे उभा वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला !  या बॅनरनी सर्व भाविक भक्त परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते, 
  यावेळी शांतता कमेठी शेगाव तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठे सहकार्य केले.   शेगाव  मार्केटचा राजा मस्कऱ्या गणेश मंडळ शेगाव बू , ओम साई मस्कऱ्या गणेश मंडळ हनुमान वार्ड शेगाव , न्यू बाल गणेश मस्कऱ्या मठ वार्ड शेगाव , बाल गणेश  मस्कऱ्या मंडळ कोटकर ले आऊट शेगाव , धूम मस्कऱ्या गणेश मंडळ इंदिरा नगर शेगाव तसेच अन्य एकूण 14 गणेश मंडळांनी यात सहभाग घेतला होता. अखेर हे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे सहकार्य लाभले होते, ग्रामपंचायत शेगाव , शेगाव पोलीस स्टेशन , शांतता कमेठी  , तंटा मुक्त समिती , गावकरी तसेच राजकीय कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य करून मस्कऱ्या गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!