सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत सोनेगाव येथे पांदण रस्त्याची मोजणी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर  जिभकाटे )

पवनी : -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आले. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा आढावा घेत नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुका पवनी अंतर्गत मौजा सोनेगाव येथे लोकांना ये - जा करणाऱ्या पांदण रस्त्याची मोजणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार  किशोर राऊत, तलाठी निशा नागदेव, भूमि अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी श्री. गिरीपुंजे व श्री. उईके उपस्थित होते.
सेवा पंधरवड्यातील या उपक्रमामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्यास हातभार लागणार असून ग्रामविकासाच्या दिशेने ही महत्वाची पायरी ठरणार आहे.सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाचे उपक्रम लोककां पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही या वेळी स्पष्ट झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!