नवभारत कन्या विद्यालय मुलची श्रावणी राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचं नेतृत्व करणार
वेटलिफ्टिंग विभागीय स्पर्धेत श्रावणी आंबुलकर प्रथम
नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचं नेतृत्व करणार
मूल: वर्धा जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालय, मूल येथील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी किशोर आंबुलकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत 48 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामुळे श्रावणीची निवड येत्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली असून, ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत श्रावणी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
श्रावणीच्या या चमकदार कामगिरीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार आणि शारीरिक शिक्षक दिनेश जिड्डीवार यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नवभारत कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी गगनभरारी घेतल्याने संपूर्ण मूल तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!