तालुकास्तरीय कला उत्सव स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय प्रथम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०५/०९/२०२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थांमधील प्रतिभा ओळखुन त्यांच्यामधील कला गुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या मार्फत सन-२०१५-०१६ पासुन कला महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात.यावर्षी सन-२०२५-०२६ च्या कला महोत्सवात स्पर्धेचा विषय "विकसित भारत-२०४७ मधील भारताची कल्पना" या विषयावर तालुका स्तरीय स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले.यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे आदिवासी समुह नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली.तसेच चित्रकला स्पर्धेत अनुष्का गजभिये हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे.त्यामुळे विजेते विद्यालयास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले.याचे सर्व श्रेय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांना जाते. विद्यालयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.लवकरच जिल्हा स्तरावर आपले नृत्य कला सादर करुन यश मिळवु असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या मार्गदर्शनात शिक्षक अशोक गिरी,सिद्धेश्वर फड, संदिप मुंडले, ललिता डेकाटे,नीता मोटघरे, अरुणा कांबळे,मानसी ठवकर,वीना जिभकाटे,अर्चना दडवे,प्रतिभा रामटेके तथा शालेय विद्यार्थी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!