पवनीत आंतरशालेय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - नव विदर्भ क्रीडा मंडळ, पवनी तर्फे 14 वर्षाखालील मुला-मुलींच्या गटाची आंतरशालेय खो-खो स्पर्धा दिनांक. 3 व 4 सप्टेंबर 2025 रोजी सक्सेना प्राथमिक शाळा, पवनी येथे अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण 8 माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये मुलांचा गट 8 शाळांचा आणि मुलींचा गट 5 शाळांचा सहभागाने रंगला.
स्पर्धेतील निकाल
मुलांच्या गटामध्ये वैनगंगा विद्यालय, पवनीने प्रथम क्रमांक पटकावला. आनंदम विद्यालय, पवनीने द्वितीय क्रमांक मिळवला तर बालाजी विद्यानिकेतन, पवनीने तृतीय क्रमांक पटकाविला.
मुलींच्या गटात बालाजी विद्यानिकेतन, पवनीने प्रथम क्रमांक पटकावला. पवन विद्यालय, पवनीला द्वितीय क्रमांक मिळाला तर रेनबो इंग्लिश स्कूल, पवनी तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
उद्घाटन सोहळा
दिनांक. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती पवनीचे गट शिक्षणाधिकारी वासनिक, नगर परिषद पवनीचे शिक्षणाधिकारी पारधी, नगर परिषद पवनीचे माजी नगरसेवक राकेश बिसने, तालुका क्रीडा संयोजक तसेच गांधी विद्यालय कोंढा चे प्राचार्य दिलीप पवार, सक्सेना प्राथमिक शाळा पवनीचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर जिभकाटे, मुख्याध्यापक चेटुले, डॉ. पल्लवी चित्रीव, माजी मुख्याध्यापक भगवान जनबंधु, वैनगंगा विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप घाडगे, क्रीडा शिक्षक तुषार रंगारी, पवन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जाधव, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अशोक गिरी यांची उपस्थिती लाभली.
बक्षीस वितरण सोहळा
दिनांक. 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी पवनी शिक्षण संस्थेचे सचिव सय्यद अली, सक्सेना प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक भगवान जनबंधु, वैनगंगा विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप घाडगे, क्रीडा शिक्षक तुषार रंगारी, पवन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक राजेश येलशेट्टीवार व जाधव, आनंदम विद्यालयाचे संचालक फाल्गुनी पाठक, आनंदम कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य वानखेडे, लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा पवनीचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख राजू तुमसरे उपस्थित होते.
मंडळाच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी
या दोन दिवसीय स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. खेळाडू, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीमुळे वातावरण खेळकर आणि उत्साहपूर्ण बनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नव विदर्भ क्रीडा मंडळ पवनीचे संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, भारत मेश्राम, मोनू मुंडले, निखिल शहारे, चेतन गेडाम, मिलिंद तुळाणकर, परिमल लांजेवार, सक्षम कोहाट, सोहम लांजेवार, चेतन शेंडे, आर्यन बावणे, यश ढेंगरे, राहुल निंबेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!