वरोरा,शेगाव,चिमूर मार्ग बंद मुसळधार पाण्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित -
वरोरा,शेगाव,चिमूर मार्ग बंद
मुसळधार पाण्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित
वरोरा.... जगदीश पेंदाम
मुसळधार पावसाने तालुक्यातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा,मुधोली,चारगाव कडे वाहतूक करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाच्या वरून पाच फूट पाणी असल्यामुळे वरोरा शेगाव, चिमूर मार्ग बंद झाला असून ठिकठिकाणी रस्ते बंद होवून सकाळपासूनच वाहतूक ठप्प पडलेली आहे..
पावसामुळे ग्रामीण भागातीत अर्जुनी तुकुम, कोकेवाडा तु. मुधोली, चारगाव गावालगत असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदी काठावरील कापूस, सोयाबीन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे..
परिसरात असलेले चारगाव धरण, निमढेला तलाव मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो भरून पाणी वाहत असून नाल्याचे पाणी शेत शिवारात शिरले आहे, त्यामुळे वरोरा चिमूर,शेगाव, चंद्रपूरकडे जाणारे रस्ते बंद असून वाहतुकीचे मार्ग बंद आहे सकाळपासूनच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेली आहे, तालुक्यातील शेगाव परिसरातील ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले असून जनावराच्या चाराचे नुकसान झालेले आहे..
ग्रामीण भागातील दवाखान्यात जाणारे गावाकडे जाणारे अनेक नागरिक या धडीवर अडकलेले होते त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची दखल घेण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे...
वरोरा तालुक्याकडे जाणाऱ्या अर्जुनी तुकुम मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची मागील अनेक वर्षापासून जनतेकडून करण्यात येत असून याकडे लोकप्रतिनी दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेत पुलाची उंची वाढवण्याची मागणी जनतेकडुन करण्यात येत आहे.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!