शालेय U-19 जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत चांदणी शर्मा अजिंक्य यांची नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव (बुज) येथील विद्यार्थिनी चांदणी शर्मा हिने शालेय U-19 जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत सर्व सामने जिंकले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे आता तिची निवड नागपूर येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.
चांदणी शर्माने सुरुवातीपासून प्रत्येक फेरीत अचूक रणनीती, शांत मन आणि चपळाईच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. तिच्या खेळातील परिपक्वता पाहून परीक्षकांनी व उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.तिच्या यशामागे शाळेचे प्राचार्य  बालाजी ढाकूणकर यांचे सदैव प्रोत्साहन, तसेच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू व महारष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मार्गदर्शक  नरेन्द्र गुरुदास कन्नाके यांचे कसून मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. नियमित सराव, योग्य तांत्रिक तयारी व सकारात्मक दृष्टीकोन या त्रिसूत्रीमुळेच चांदणी शर्माने हे यश मिळवले आहे.या विजयानंतर विद्यालय परिसरात व गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्राचार्य बालाजी ढाकूणकर यांनी सांगितले की, “चांदणीने मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले असून तिच्या कामगिरीमुळे आमच्या विद्यालयाचा लौकिक उंचावला आहे. विभागीय स्पर्धेतही ती नक्कीच आपली चमक कायम ठेवेल, असा आम्हाला विश्वास आहे.चांदणी शर्माच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही बुद्धिबळ व बौद्धिक खेळांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्पर्धेत अव्वल येऊन दाखवून दिले आहे की, “स्वप्ने मोठी असली की यश दूर नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!