पट्टेदार वाघाने बैलास केले गंभीर जखमी

चिमूर तालुक्यातील येरखेडा येथील घटना

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - किसन नत्थूजी खेडेकर राहणार येरखेडा मौजा नवेगाव पेठ यांच्या शेत शिवार सर्वे क्र. २०९ या ठिकाणी दिनांक.२४/०९/२०२५ ला दुपारी अंदाजे ०३:०० वाजता च्या दरम्यान पट्टेदार वाघाने ७ वर्षाच्या बैलास गंभीर जखमी केले. हा बैल लाख रुपयांचा असल्याचा गावाकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती या घटनेमुळे शेतकऱ्यार मोठे संकट आले असून या घटनेची माहिती प्रादेशिक वनविभागास मिळताच क्षणी घटनास्थळी रामदास दशरथ नैताम क्षेत्र सहाय्यक भिसी, गणेश ढोरे वनरक्षक , विलास कपाळे वनरक्षक यांनी पंचनामा करून बैलावर तात्काळ पशुवैधकीय अधिकारी यांनी उपचार केले परंतु अजूनही बैलाची परिस्थिती हि गंभीर स्वरूपाची असून वनविभागाने आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!