'शिक्षण व्यवस्था सर्वोत्तम करण्याची जबाबदारी शिक्षक व पदाधिकाऱ्यांवर' - डॉ.पंकज भोयर
शिक्षक,साधन व्यक्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.२५/०९/२०२५ शिक्षण व्यवस्था सर्वोत्तम करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, तसेच पदाधिकाऱ्यांवरही आहे. शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी योग्यरितीने जबाबदाऱ्या पार पाडल्या तरच सशक्त समाजाची निर्मिती होईल. पीएमश्री शाळा व सीएमश्री शाळांमुळे शिक्षण प्रवाहाला गती मिळाली आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी विशेष योजना राबविली जाईल. तसेच दर सोमवारला पालकमंत्री जनता दरबार प्रत्येक तालुक्यात भरणार असून, त्याच्या अंमलबजावणीची घोषणा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली.भंडारा जि.प.वतीने २३ सप्टेंबर रोजी अखिल सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन २०२५-२६ करिता ९ आदर्श शिक्षक, ५ साधनव्यक्ती ,२ विशेष शिक्षक (समावेशीत शिक्षण) व वर्ग १० वी तसेच १२ वीत ४८ गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच उत्कृष्ट परसबाग निर्माण करणाऱ्या शिक्षकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार राजू कारेमोरे, मा.खासदार सुनील मेंढे, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवे, डायटचे प्राचार्य राजेश रुद्रकार, जि. प. सभापती शितल राऊत, सभापती अनिता नलगाेपुळवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमाेदकुमार पवार, माजी शिक्षण सभापती रमेश पारधी, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र साेनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला गाेतारे, उपशिक्षणाधिकारी विनायक बंजारी, हरीकिसन अंबाडे, गटशिक्षण अधिकारी संजयकुमार वासनिक , विजय आदमने, अर्चना माटे, देवेंद्र शेंडे, विस्तार अधिकारी रवींद्र माडेमवार, लता धकाते, जि. प. सदस्य यशवंत साेनकुसरे, दिलीप साळवे, जि. प. सदस्य, अधिकारी मुकेश बनसोड, जयश्री सावरकर, विलास गोंदुळे,व कर्मचारी उपस्थित होते.महेन्द्र वाहणे यांचा सन्मान करताना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर,आमदार राजू कारेमोरे, मा.खा.सुनील मेंढे आदी उपस्थित होते. तर प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रवींद्र साेनटक्के, संचालन महेश जगनिक, मुकुंद ठवकर, तर आभार मंगला गाेतारणे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!