सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे नागभीड केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
शिक्षकांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अद्ययावत होणे काळाची गरज - संजय गजपुरे
सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे नागभीड केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
नागभीड:
शिक्षक हा देशाच्या प्रगती मध्ये वाटा उचलणारा महत्वाचा घटक असून बदलत्या स्पर्धेच्या युगात सर्वच आघाड्यांवर शिक्षकांनी अद्ययावत राहणे फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प.चंद्रपुर चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी केले. सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे नागभीड केंद्राची केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. सदर परिषदेचे उद्घाटन स्वराज्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद चंद्रपुरचे माजी सदस्य संजयजी गजपुरे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष स्थानी नागभीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून नागभीड केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर करंबे, सरस्वती ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे सर यांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे संचलन सहा. शिक्षक पराग भानारकर यांनी केले.
माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून परिषदेचे रीतसर उदघाट्न करण्यात आले. या प्रसंगी उदघाटक स्थानावरून बोलताना संजय गजपुरे यांनी मोबाईलच्या काळात वाचन संस्कृती हरवली असून प्रत्येकाने वाचनाच्या प्रेमात पडणे आवश्यक असल्याचे सांगत शासनाच्या माध्यमातुन वेळोवेळी होणाऱ्या शैक्षणिक बदलाची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांना उपक्रमशील करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना गट शिक्षणाधिकारी संजयजी पालवे सर यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी तयार न करता त्याला देशाचा सुजाण नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातुन उत्तम संस्कार देण्याचा प्रयत्न करण्याचे शिक्षकांना आवाहन केले.
या शिक्षण परिषदेचे मुख्य मार्गदर्शक करंबे सर यांनी निपुण विद्यार्थी तयार करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले तर शिक्षकांनी शाळेला मिळालेल्या शैक्षणिक साहित्याच्या पेटी मधील साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थी सुरक्षितता, शालेय पोषण आहार, भौतिक सोयी, नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, या सह उपयुक्त विषयावर मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या शिक्षण परिषदेत मराठी विषयाचे आदर्श पाठ जि.प.उच्च प्राथ. शाळेच्या शिक्षिका मडावी मॅडम, गणित विषयाचे आदर्श पाठ जि.प.प्राथ. शाळेच्या शिक्षिका नगराळे मॅडम, इंग्रजी विषयाचे आदर्श पाठ जि.प.उच्च प्राथ.शाळेचे शिक्षक खोब्रागडे सर यांनी घेतले तर दिव्यांग शिक्षण यावर विंचूरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले . नवोदय व शिष्यवृत्ती या परीक्षेच्या संबंधाने महीपाल मांढरे सर यांनी विशेष वर्ग घेतला. या सर्व विषयावर व साधक बाधक आंनददायी वातावरणात चर्चा पार पडली .
नागभीड केंद्रातील सर्वच शाळांतील शिक्षकांनी यात सहभागी होत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. वंदे मातरम ने या परिषदेची सांगता झाली. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सरस्वती ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे , सहा. शिक्षक आशिष गोंडाणे , कु. आशा राजुरकर , कु. किरण वाडीकर, पराग भानारकर , सतिश जिवतोडे , सौ. मेघा राऊत, कु. पुजा वीर , कु. नेहा कावडकर व सौ. शितल पाकमोडे यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!