बच्चुभाऊंच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अमोल काटकरांचा रोष !

लवकरच बच्चुभाऊ यांची माढेळी येथे शेतकऱ्यांची भेट होनार, जिल्हाप्रमुख शेरखान पठाण

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - माढेळी गावात माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या सभेची शेतकरी वर्गाला आस लागली होती. "सातबारा कोरा" या ज्वलंत प्रश्नावर चर्चा व्हावी, शेतकऱ्यांच्य व्यथा ऐकाव्यात यासाठी वरोरा तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अमोल काटकर यांनी खांद्यावर जबाबदारी घेत पंधरा दिवस गावोगाव पायपीट केली. ७ ते ८ हजार शेतकरी, दिव्यांग, वृद्ध, महिला बांधवांनी शेतीची कामे सोडून सभेला उपस्थिती लावली. मंडप, डेकोरेशन, बैलबंडी व सर्व सोयीसुविधा ग्रामस्थांनी स्वखर्चाने केल्या. प्रत्येकाच्या मनात फक्त एकच आशा होती  "आपला नेता बच्चुभाऊ शेतकऱ्यांना न्याय देईल.” पण ज्या क्षणी बच्चुभाऊ सभेला न आले, त्या क्षणी शेतकऱ्यां-च्या चेहऱ्यावरचे तेज मावळले. हजारो लोकांची वाट पाहणारी
नजर एका क्षणात अश्रृंनी भरली. ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्त्यां मध्ये संतापाची लाट उसळली. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेला कार्यक्रम वाया गेला. कीर्तन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा रंग फिका पडला.
कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुखांच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरले आणि थेट राजीनाम्याच्या मागणीचे सूर ऐकू आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दारात उभ्या असताना प्रहार कार्यकर्त्यांची दमछाक सुरू झाली आहे. या पार्श्वभूमी-वर अमोल काटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हृदयद्रावक प्रश्न विचारला "शेतकरी बांधवांना दोन मिनिटे बोलायला वेळ नाही, मग आमच्या संघटनेच्या प्रेमाचा, विश्वासाचा मोबदला काय?"
माढेळीतील या घटनेने बच्चुभाऊंवरील शेतकऱ्यांचा विश्वास हादरला असून संघटनेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खांबाळा येथील चक्काजाम आंदोलनात बच्चुभाऊ कडू म्हटले होते की जिथपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत मी येथून उठणार नाही एक सभा आम्हाला रद्द करावी लागली तरी चालेल दिवस रात्र शेतकरी यांच्यासाठी लढणाऱ्या त्या गुरुदेवाला सलाम पण माझ्याविषयी इर्षाची देशाची भावना ठेवणाऱ्या काही लोकांनी म्हटले जिल्हाप्रमुख यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बच्चुभाऊ पोहोचले नाही अशा लोकांचा मी निषेध करतो, तसेच माढेळी येथील शेतकरी कार्यकर्त्यांची माफी मागतो लवकरच मांडणी होईल येतील शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना बच्चुभाऊ भेट देणार

जिल्हाप्रमुख शेरखान पठाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!